Ad will apear here
Next
शेळीपालनातून ‘गरिबी हटाव’चा नारा
आदिवासी महिलांना डॉ. दिलीप धानके यांच्याकडून प्रशिक्षण


भिवंडी : मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स आणि ईगल संस्था यांच्यातर्फे आदिवासी व कातकरी महिलांसाठी गरिबी हटाव हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत लाभार्थींना शेळ्यांचे वाटप करून योग्य ते प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे या महिलांना अर्थार्जनाचा नवीन स्त्रोत उपलब्ध झाला आहे. मौजे चांग्याचापाडा येथे नुकताच असा प्रशिक्षण कार्यक्रम झाला.

‘माझगाव डॉक शिप’च्या सीएसआर फंडातून यासाठी निधी दिला जात आहे. ‘ईगल’तर्फे गरीब व दुर्बल घटकातील लाभार्थी निवडून त्यांना उस्मानाबादी जातीच्या प्रत्येकी तीन शेळ्यांचे वाटप केले जाते. आतापर्यंत शंभर कुटुंबात या शेळ्या देण्यात आल्या आहेत. मौजे चांग्याचा पाडा येथे संस्थेने सर्व महिला लाभार्थींचे एक दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण शिबिर घेतले.  

या शिबिरात किन्हवली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉ. दिलीप धानके यांनी शून्य खर्चावर आधारीत शेळीपालन व्यवसाय कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शेळ्यांच्या आहारासाठी घरगुती कडधान्ये, जंगलातील उपयुक्त वनस्पती व वेलवर्गीय भाजीपाल्याचा टाकाऊ पालापाचोळा यांचा आहारात कसा समावेश करावा याची सोप्या शब्दांत माहिती दिली.

‘ईगल’तर्फे आयोजित केलेल्या प्रत्येक शिबिरात डॉ. धानके आदिवासी महिलांशी संवाद साधून ‘सर्व स्त्रिया बुद्धिमान असून, त्यांना कुटुंब चालविण्याचे अर्थशास्त्र पुरुषांपेक्षा अधिक चांगले समजते,’ असे सांगून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. डॉ. धानके यांनी प्रशिक्षणातून आदिवासी महिलांमध्ये जाणीव जागृती करण्याचा विडा उचलला आहे; तसेच या शेळीपालकांना पशुवैद्यकीय सेवा आणि औषध पुरवठ्याबाबतही ते योगदान देऊन ‘ईगल’शी जोडले गेले आहेत.
 


संस्थेचे मुख्य संचालक डॉ. नीलरतन शेंडे यांनी शहापूर तालुक्यातील किमान एक हजार आदिवासी कुटुंबांना शेळीपालन व्यवसायातून उभे करण्याचा संकल्प केला आहे. अनेक गावांतून लाभार्थी निवडून या संस्थेने ‘गरीब हटाव’ उपक्रमात गरुडझेप घेतली आहे. या प्रशिक्षण शिबिराप्रसंगी ‘ईगल’चे प्रकल्प समन्वयक मनोज वाहणे, डॉ. सुनील भंडलकर यांनी मनोगत व्यक्त केले.

या शिबिरात ‘ईगल’चे कर्मचारी कल्पेश मोरे, परशु चवर, सुनील डांगळे, समीर पानसरे, श्रेयस भोईर आदी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZYWBU
Similar Posts
शेळी म्हणजे आदिवासी महिलांची अर्थलक्ष्मी शहापूर : ‘महात्मा गांधीजींनी शेळीला गरीबाची गाय म्हटले होते. कारण शेळी हा एक उपयुक्त प्राणी आहे. आता शेळीच्या मांसविक्रीला मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. शेळीपालनातून गावांतच रोजगार उपलब्ध होत आहे. म्हणून शेळी ही आदिवासी महिलांची अर्थलक्ष्मी ठरली आहे,’ असे प्रतिपादन किन्हवली पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉ
भिवंडीत पारंपरिक आदिवासी दिवाळी महोत्सव भिवंडी : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आदिवासी विकास क्षेत्रात काम करणाऱ्या येथील विजेता विचार फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुपचा सहेली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडीतील काटई येथील डोंगरपाडा दिवानमाल या आदिवासी पाड्यावर पाच नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत पारंपरिक आदिवासी दिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
पडघा केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहात भिवंडी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या २०१५पासून सुरू केलेल्या उपक्रमांतर्गत शिक्षणात होणाऱ्या बदलांवर चिकित्सा व्हावी व शिक्षकांना योग्य माहिती मिळावी म्हणून भिवंडी तालुक्यातील पडघा शैक्षणिक केंद्राची मासिक शिक्षण परिषद पडघा-समतानगर बोरिवली जिल्हा परिषद मराठी शाळेत नुकतीच पार पाडली.
मिलिंद जाधव यांना राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार भिवंडी : भांडुप येथील विकास प्रबोधिनी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनात मिलिंद जाधव यांना राज्यस्तरीय ‘युवा उत्कृष्ट पत्रकारिता २०१९’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language